मोदीच का ? …

0 out of 5

250.0

काँग्रेसला सत्ता मिळाल्यापासून अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार माजला, कायद्याच्या राज्याचा बोजवारा उडालेला आहे, महागाई शिगेला पोहोचली.
पण त्यातून लोकांना दिलासा देणारा कुठलाही पर्याय वा उपाय सेक्युलर म्हणवणारे पक्ष देऊ शकलेले नाहीत. उलट काँग्रेस सेक्युलर आहे,
म्हणून त्याची पाठराखण इथले सेक्युलर पक्ष व विचारवंत करीत असतात.

म्हणजेच सेक्युलॅरिझमसाठी लोकांनी होतील ते हाल सोसावेत; असाच पर्याय लोकांसमोर ठेवला गेला आहे. त्याच्याशी गुजरातची तुलना केली, तर सेक्युलर नाही म्हटल्या जाणार्‍या गुजरात सरकारचे व मोदींचे काम उजवे आहे. तिथे कायद्याचे राज्य आहे, तिथे कारभार चोख आहे, तिथे भ्रष्टाचार कमी आहे, तिथे विकास वेगाने चालू आहे. जणू सेक्युलर नसणे म्हणजेच नागरिकांचे जीवन सुसह्य; अशीच स्थिती म्हणावी लागेल.

मग कॉग्रेस सत्तेवरून हटवायची असेल, तर उत्तम पर्याय कुठला असेल? लोक असा पर्याय शोधतात. मोदी म्हणजे विकास, भ्रष्टाचार मुक्त कारभार आणि ठामपणे निर्णय घेणारा नेता, अशा पायर्‍या मोदी चढत गेलेले आहेत.

Category: राजकीय

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मोदीच का ? …”

Your email address will not be published. Required fields are marked *